Home About Us Contact Login

Home Top Ad

Welcome to WakeUp Digital Magazine

तुम्हाला सोशल मीडियावर खळखळून हसवणारे मीम्स लाखो रुपये कमावून देतात

सोशल मीडियावर आज 70 टक्के मीम आणि ट्रोल्स पाहायला मिळतात. युवा पिढी मोठ्या प्रमाणात या मिम्सकडे आकर्षित होताना पाहायला मिळत आहे. पण मीमचे हे माध्यम एवढे आकर्षित करणारे का आहे? निवडणुकीमध्ये राजकीय पक्ष याचा वापर कशा प्रकारे करतात? याच प्रश्नांची उत्तरं मुंबई विद्यापीठातील माध्यम आणि संवाद शाखेचे  डॉ. संजय रानडे यांनी दिली आहेत.

मीम्समुळे कमी शब्दांमध्ये जास्त माहिती देता येते हा सर्वात मोठा फायदा आहे. कमी शब्दात जास्त माहिती मिळाल्यामुळे हे माध्यमा आकर्षक बनलंय. निवडणुकांमध्येही मीमचा वापर आता वाढणार आहे. राजकीयदृष्ट्या मीमचा मोठा फायदा येत्या काळात होईल, असं संजय रानडे यांचं म्हणणं आहे.

मीम बनवून लाखो रुपये कमावणारं एक मोठं नेटवर्क देशभरात आहे. मुंबईतही हेच पाहायला मिळतंय. निवडणुका जवळ येतील तसं आपल्याला सोशल मीडियावर मिम्सचे प्रमाण वाढताना दिसून येईल यात शंका नाही.