Home About Us Contact Login

Home Top Ad

Welcome to WakeUp Digital Magazine

टूथपेस्ट वरील या विविध रंगाचा अर्थ जाणून घ्या आणि वेळीच सावध व्हा…


आपल्या टूथपेस्ट मध्ये मीठ आहे त्यामुळं सर्व किटाणू मरतात. या पेस्ट मध्ये आहे कार्बन जो घालवतो सर्व दुर्गंधी. या पेस्टमध्ये आहे इलायची आणि पुदिना ज्यामुळे दात चमकत राहतील. टीव्हीवर प्रत्येक वेळेस टूथपेस्टच्या ऍड पाहिल्यानंतर तुम्हाला यापैकीच गोष्टी ऐकायला मिळतील. परंतु तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या टूथपेस्ट मध्ये नेमकं काय आहे. टूथपेस्ट कशापासून बनलं आहे आणि त्या ट्युबमध्ये नेमकं आहे तरी काय. कंपन्या प्रचारासाठी काही पण बोलुद्या पण तुम्ही कंपन्यांच्या खर आणि खोट्याविषयी समजू शकता. कारण काही पेस्ट खूप धोकादायक केमिकल्स पासून बनवलेले असतात. दात तर स्वच्छ होतील पण हे केमिकल्स जीवघेणे ठरू शकतात.
टूथपेस्टने दात जेवढे स्वच्छ होतात तेवढे ते धोकादायक सुद्धा ठरू शकते. परंतु तुम्ही थोडं समजूतदारपणे लक्ष ठेवले तर तुम्ही कंपन्यांच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचू शकता. खरंतर प्रत्येक टुथपेस्ट कंपनीला नियमानुसार आपल्या टूथपेस्टमध्ये वापरल्या गेलेल्या घटकांविषयी माहिती देणे बंधनकारक आहे. टुथपेस्ट कंपन्या मात्र ग्राहकांची दिशाभूल करण्यासाठी याविषयीची माहिती सांकेतिक भाषेत देतात. टुथपेस्ट कंपनी या गोष्टीची माहिती वेगवेगळ्या रंगाच्या छोट्या पट्टीच्या माध्यमातून देतात. तुम्ही नेहमी बघितले की वेगवेगळ्या टूथपेस्टवर खालच्या बाजूस वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्या असतात.
आज बाजारात तुम्हाला काळ्या, लाल, निळ्या आणि हिरव्या रंगाचे मार्क असलेले टुथपेस्ट मिळतील. त्यामुळं टुथपेस्ट घेताना नेहमी या पट्ट्या बघून खरेदी करा जेणेकरून तुमच्या आरोग्यास याने हानी पोहचणार नाही.
*काळी पट्टी असलेले टूथपेस्ट-*
जर तुम्ही टूथपेस्ट खूप जास्त फायदे आहेत समजून घेतले तर त्यात नक्कीच केमिकल्स मिसळलेले असतात. सोबतच त्यावर खाली एक काळ्या रंगाची पट्टी असते, जी दर्शवते की काळ्या या टूथपेस्ट मध्ये सर्वात जास्त केमिकल्स मिसळलेले आहेत. असे टुथपेस्ट चुकूनही खरेदी करू नका.
*लाल पट्टी असलेले टूथपेस्ट*
टूथपेस्टवर जर लाल रंगाची पट्टी असेल तर याचा अर्थ ते थोडं कमी धोकादायक आहे. काळ्या रंगाची पट्टी असलेल्या पेस्टपेक्षा चांगलं आहे. म्हणजेच यामध्ये नैसर्गिक गोष्टी बरोबर केमिकल्सचा सुद्धा वापर करण्यात आलेला आहे.
*निळी पट्टी असलेले टुथपेस्ट-*
निळ्या रंगाची पट्टी असलेले टूथपेस्ट तुमच्या साठी बऱ्यापैकी सुरक्षित असते. कारण यामध्ये नैसर्गिक सोबत मेडिकेशनवाले तत्व सुद्धा असतात. जे तुमच्या दातांच्या स्वच्छतेबरोबर तोंडाच्या अनेक आजारांसाठी फायद्याचे ठरू शकतात.
*हिरवी पट्टी असलेले टूथपेस्ट-*
हिरव्या रंगाची पट्टी असलेले टूथपेस्ट आरोग्यासाठी सर्वात जास्त सुरक्षित असतात. हिरव्या पट्टीचा अर्थ आहे की टुथपेस्ट बनवणाऱ्या कंपनीने फक्त नैसर्गिक तत्व वापरून याची निर्मिती केली आहे. हे टूथपेस्ट आरोग्यासाठी लाभदायक ठरतात.